
अमुक व्यक्तीवर इन्कम टॅक्सची रेड पडली! किंवा त्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली! असं ऐकल्यावर, त्यांनी नक्कीच भ्रष्टाचार केला असणार, त्यांच्या कडे अमाप पैसा आहे, त्यांनी टॅक्स चुकवला असणार अशी लोकांमध्ये चर्चा सुरू होते. परंतु असं काहीही नसतानासुद्धा केवळ तुमच्या अज्ञानामुळे तुम्हाला इन्कम टॅक्सच्या चौकशीला सामोरे जावे लागू शकते.
२० हजारांपेक्षा मोठी रक्कम कॅश स्वरूपात कर्ज स्वरूपात घेणे बेकायदेशीर आहे. मालमत्ता खरेदी-विक्री करताना स्टॅम्प ड्युटी आणि TDS चे काही सोपे नियम तुम्हाला माहित नसतील, तर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते. क्रेडिट कार्ड वापराच्या काही मर्यादा ओलांडल्यावर बँकच तुमची माहिती आयकर विभागाला देते. कर्ज घेताना काही नियम माहित नसतील, तर त्या कर्जाला तुमचं उत्पन्न समजलं जातं आणि मग तुम्हाला त्यावरसुद्धा कर भरावा लागतो.
यासंदर्भातील कोणत्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीला माहित असायला हव्यात, आयकर विभागाच्या रडारवर आपण येऊ नये यासाठी कोणत्या चुका टाळायच्या, कायदेशीर मार्गाचा उपयोग करून सुरक्षित कसं रहायचं हे सगळं जाणून घ्या सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.