
Azam Khan political future
esakal
शरत् प्रधान
दोन वर्षांच्या कोठडीतून बाहेर आल्यानंतर समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान मोठा राजकीय निर्णय घेतील, अशी चर्चा उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात आहे. आझम खान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर नाराज आहेत. मात्र, ते बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्याशी हातमिळवणी करणार की चंद्रशेखर आझाद ‘रावण’ यांच्याबरोबर, याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यांच्या या निर्णयामुळे समाजवादी पक्षाच्या मतपेढीवर काय परिणाम होतो, याकडे भाजपचे लक्ष असणार आहे.
दोन वर्षांच्या कोठडीनंतर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान तुरुंगाबाहेर आले आहेत. आझम खान रामपूर विधानसभा मतदारसंघातून १० वेळा निवडून आले आहेत. समाजवादी पक्षात आणि उत्तर प्रदेशच्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा होता. आझम खान समाजवादी पक्षाचे सहसंस्थापक असून, पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांच्या साथीने त्यांनी पक्षाला राज्यामध्ये आकार दिला.