
माझ्या आयुष्यातल्या वाटचालीत जितकं श्रेय मला मिळालं, तितकंच किंबहुना त्याहून अधिक श्रेय माझ्या भावंडांना जातं. आई-बापूंचे संस्कार तर मुळाशी घट्ट रोवलेले; पण त्याचं बीज वाढून मोठं झाड व्हावं, असं झालं ते फक्त माझ्या पाच भावांच्या आणि पाच बहिणींच्या साथीने. खरं सांगतो, माझ्या भावंडांमुळेच मला समाजकारणात वेळ देता आला. त्यांनी घर सांभाळलं, जबाबदाऱ्या उचलल्या आणि मला चळवळीत उभं राहायला मोकळं ठेवलं.
बच्चू. आमचं गाव, आमचं कुटुंब, आमचं घर या सगळ्यांनी माझ्या आयुष्याला जी शिदोरी दिली ती आजही माझ्या श्वासात रेंगाळते. खरं सांगतो, माझ्या आयुष्यातल्या वाटचालीत जितकं श्रेय मला मिळालं, तितकंच - किंबहुना त्याहून अधिक श्रेय माझ्या भावंडांना जातं.
आई-बापूंचे संस्कार तर मुळाशी घट्ट रोवलेले; पण त्याचं बीज वाढून मोठं झाड व्हावं, असं झालं ते फक्त माझ्या पाच भावांच्या आणि पाच बहिणींच्या साथीने.
विजय दादा... शेतकरी संघटनेचा आधारस्तंभ. आमच्या घरातला थोरला भाऊ, विजय दादा. बी. एस्सी. ॲग्रिकल्चरचं शिक्षण पूर्ण करून त्याच्यासमोर नोकरीच्या ढिगभर संधी उभ्या होत्या. पण त्याने सरळ जाहीर केलं - ‘जय जवान, जय किसान... हेच खरं ब्रीद! मी शेतकऱ्यांसाठीच काम करणार.’ आई म्हणायची, दादा फारच नीटनेटका. त्या काळी प्रेस कुठे होत्या? तो गडव्यात कोळसा तापवून कपडे इस्त्री करायचा आणि सभेत उभा राहिला, की लोक थक्क! विषयांचा सखोल अभ्यास, ओघवती वाणी आणि अढळ आत्मविश्वास.