

Bacchu Kadu Election
esakal
साधनं नव्हती. यंत्रणा नव्हती. पैसा नव्हता; पण एक गोष्ट होती ती म्हणजे, कार्यकर्त्यांचा विश्वास! पदाधिकाऱ्यांची निष्ठा आणि प्रहार युवाशक्ती संघटनेच्या शुभचिंतकांची ताकद! सर्वानुमते ठरलं, लोकसभा २००४ ची निवडणूक अपक्ष म्हणून लढवायची आणि तीसुद्धा आंदोलन म्हणून! जिंकण्यासाठी नाही; तर व्यवस्था हलवण्यासाठी लढायची!