
‘प्रहार’चे नेते व माजी मंत्री बच्चू कडू यांच्या सात-बारा कोरा यात्रेला सोमवारपासून विदर्भात सुरुवात झाली. शेतकऱ्यांसाठी जात, पात, धर्म, राजकीय विचार सर्व बाजूला ठेवून आम्ही एकत्र आलो असून शेतकऱ्याचा सातबारा कोरा केल्याशिवाय आता थांबायचं नाही, असा निर्धार बच्चू कडू यांनी केला आहे. त्यानिमित्ताने ‘सरकारनामा’चे प्रतिनिधी सचिन वाघमारे यांनी साधलेला संवाद.