

Bachchu Kadu tractor protest
esakal
बँकेने त्या काळात ५८ ट्रॅक्टर आणि एक जीप थकबाकीदारांकडून जप्त केली होती. आता शेकडो ट्रॅक्टरचा लिलाव होणार होता. शेतकरी हवालदिल झाले होते. कुणी न्याय दिला नाही... कोणत्याच राजकीय पक्षांनी न्यायाचा पवित्रा घेतला नाही. हतबल झालेले शेतकरी ‘प्रहार’कडे आले. ‘प्रहार’स्टाइल आंदोलन झालं आणि आणि इतिहास घडला. बँकेने ट्रॅक्टर शेतकऱ्यांना परत दिले.
तकऱ्याचा आवाज दाबता येत नाही; कारण तो मातीतून येतो!’
२००२चा तो काळ! आम्ही पंचायत समितीचा सभापती म्हणून शेतकरी शेतमजुरांसाठी मोठमोठे आंदोलन केलेला काळ होता. रोज कुणी ना कुणी शेतकरी दालनात आपली व्यथा सांगायला यायचा; पण त्या दिवशी आलेले शेतकरीबांधव निराशेने थरथरत होते.
‘‘भाऊ, आमचे ट्रॅक्टर बँकेने ओढून नेलेत... आता ते लिलावाला ठेवले आहेत!’’ ते म्हणाले, ‘‘कर्ज घेतलं शेतीसाठी; पण पाऊस नाही, पीक नाही... आम्ही शासकीय खरेदी केंद्रावर कापूस मोजला; पण अजून सरकारकडून पैसे मिळाले नाहीत... आता आम्ही काय करू?’’ त्यांचे शब्द मनात खोल गेले. कारण मला ठाऊक होतं, हा विषय फक्त कर्जाचा नव्हता; तर शेतकऱ्याच्या सन्मानाचा होता.