Premium|Bajaj Pune Grand Tour : ही शर्यत अर्थकारण बदलेल

Pune sports events : “पुण्यात बजाज पुणे ग्रँड टूरच्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेची भव्य तयारी सुरु.”
Bajaj Pune Grand Tour

Bajaj Pune Grand Tour

esakal

Updated on

सुनंदन लेले

जानेवारीचा चौथा आठवडा भारतीय खेळप्रेमींसाठी खास ठरणार आहे. भारतात क्रिकेटबरोबर फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस, ॲथलेटिक्स, टेबल टेनिस आणि अगदी गोल्फच्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवल्या जातात. जगभरातील खेळाडू येऊन त्यात सहभागी होतात; पण भारतात सायकल चालवणारे भरपूर लोक असताना सायकलिंगची आंतरराष्ट्रीय स्पर्धा कधीच भरवली गेली नव्हती. १९ जानेवारी ते २३ जानेवारीदरम्यान पुणे परिसरात बजाज पुणे ग्रँड टूरचे आयोजन केले आहे. तसे बघायला गेले तर या स्पर्धेचे खरे यजमान महाराष्ट्र सरकार आहे. प्रत्यक्षात ही स्पर्धा भरवण्यात महाराष्ट्र सरकारने हातभार लावला असला तरी पुणे जिल्हा प्रशासनाने सर्वांत मोठी कामगिरी केली आहे. एक वर्षापूर्वी या सायकल स्पर्धेचे स्वप्न प्रशासनातील अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडले होते, ज्यात पुणे जिल्ह्याचे आयुक्त जितेंद्र डुडी यांनी प्रमुख भूमिका निभावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कल्पना आवडली आणि त्यांनी संपूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. आता बजाज पुणे ग्रँड टूर तोंडावर आली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी साधलेला संवाद...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com