पुणे : बाळाने तीन दिवस झाले शी केलेली नाहीये... त्यातच ऑफिसच्या कामामुळे मी दोन दिवस बाहेर.. रविवारी बाळाचे नेहमीचे डॉक्टर नाहीत.. घरातले सगळेच काळजीत पडलेत. बायको घाबरून रडू लागली आहे. नातेवाईकांमधले एक जण डॉक्टरच आहेत, ते म्हणाले चालतं मुलांनी शी केली नाही तरी... त्यातच माझी आई आणि बाबा मात्र सारखं बाळाला दवाखान्यात का घेऊन जाता, घरगुती उपाय करा म्हणून वाद घालत आहेत... हे चित्र आता नेहमीचेच झाले आहे.
घरातल्या जवळपास सगळ्याच जेष्ठ नागरिकांना वाटते आहे की हे जरा अतिच करतात. यांना पैसे खूप झालेत, जरा काही झालं की त्या बाळाला दवाखान्यात घेऊन पळतात, त्यांना मोठी माणसं सांगतात ते काही पटतंच नाही, डॉक्टर काही वेगळं सांगत नाही, त्यांचा घरगुती उपचारांवर विश्वासच नाही, आमच्या काळी हे इतकं कौतुक नव्हतं.. आम्ही काय पोरं वाढवली नाहीत का..?
सुरूवातीला गंमतीने घेतली जाणारी ही वाक्य नंतर गोंधळात पाडायला लागतात. आई वडिल म्हणून काळजीत पाडू लागतात. बाळाला काही झालं तर... आपण बाळाबाबत अती विचार करतोय का..? सारखे डॉक्टरांकडे नेने आणि औषधे देणे योग्य आहे का..? घरातले मोठे सांगतायेत ते ऐकावं की डॉक्टर काय सांगतायेत तसं करावं..? काहीच कळत नाही. पालक म्हणून खूप गोंधळायला होणं हे प्रतिकप्रमाणे तुमच्याही बाबतीत होते आहे का..?
बाळ किंवा एकुणातच मुलं या विषयावरून घरातील ज्येष्ठ मंडळी आणि तुमची पिढी यात सतत वादाचे प्रसंग उद्भवतात का..? एकीकडे पालक म्हणून तुम्ही नवखे असता तुमचा त्या विषयात पुरेसा अभ्यास देखील नसतो. आपल्या हातून काही चुकू नये अशी भिती सतत वाटत असते... अशा परिस्थितीत कसं वागायचं, काय करायचं हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया 'सकाळ प्लस' च्या या लेखातून...