nominee is not owner
Esakal
वारसा हक्क भाग - ३
पुणे - माझ्या नंतर माझ्या मुलांनी प्रॉपर्टीवरून भांडणं करू नये यासाठी मी आधीपासूनच तजवीज करून ठेवली आहे. त्यासाठी मी आतापासूनच माझ्या सगळ्या बँक खात्यांना आणि माझ्या पीएफच्या पैशांना तसेच माझ्या घराला नॉमिनी म्हणून नावं लावली आहेत. त्यामुळे आता त्यांनी वाद घालायचे काही कारणच उरलेले नाही. असा विचार जर तुम्हीही करत असाल तर कायद्याच्या चौकटी या नेमकं काय सांगतात हे आधी समजून घ्या.
कायदा सांगतो नॉमिनी हा त्या प्रॉपर्टीचा खरा वारस नसतो. मग खरा वारस कोण? नॉमिनी आणि वारसदार यांच्यात काय फरक असतो? माझ्या पश्चात माझ्या इंन्शुरन्सचे पैसे कोणाला मिळावे यासाठी तुम्ही नॉमिनी म्हणून नाव लावलं असेल आणि त्या व्यक्तीला पैसे मिळालेच नाहीत तर? यासाठी काय करायला हवं? घर, शेअर्स, बँकेतले पैसे यासाठी नॉमिनीचा कायदा एकसारखाच आहे की वेगवेगळा? न्यायालयात याविषयी कोणते वाद गाजले आणि त्यातून काय निर्णय दिले गेले, असे पेचप्रसंच पुढे येऊच नयेत यासाठी काय तरतूद करायला हवी असं सगळं या वारसाहक्क सिरीज मधून जाणून घेणार आहोत.