
गीतांजली हट्टंगडी,
geetanjali57@yahoo.co.in
या लेखाचे हे जरासे विचित्रच शीर्षक बघून बुचकळ्यात पडला असाल ना? मराठी साहित्यात आपले अढळ स्थान निर्माण करणाऱ्या लोकप्रिय ज्येष्ठ साहित्यिक-लेखिका म्हणजे शांताबाई शेळके.
गेल्या १२ ऑक्टोबरला त्यांचा १०२ वा जन्मदिन होता. त्यांच्या कथा, कविता, गाणी, हायकू, अनुवाद, लेख असे अनेक प्रकारचे साहित्य आपल्या सर्वांच्याच वाचनात आले आहे.
अशा शांताबाई शेळके आमच्या बँकेच्या (बँक ऑफ बडोदा) ग्राहक होत्या. त्यांच्या भेटीचा दुर्मीळ ‘अर्थ’योग बँकेमुळे जुळून आला.