
डॉ. संदीपान जगदाळे
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे भारताच्या शैक्षणिक इतिहासातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामध्ये भाषा शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये बालवयातील मातृभाषा शिक्षण आणि त्रिभाषा सूत्रावर विशेष भर देण्यात आला आहे.
यामध्ये हिंदीचा समावेश असला तरी ती सक्ती नाही. महाराष्ट्रात यासंदर्भात काही गैरसमज व मतभेद दिसून येतात. या लेखात आपण बालवयातील भाषा शिक्षणाचे फायदे, त्रिभाषा सूत्राचे वास्तव आणि हिंदीच्या भूमिकेवर सुस्पष्ट विचार करणार आहोत.