
डॉ. अविनाश भोंडवे
आहार हा आरोग्याचा पाया असतो. तो संतुलित असावा लागतो. त्यासाठी आपण कुठले अन्नपदार्थ खात आहोत याचेही भान असावे लागते. आहारात येणारे अन्नपदार्थ अधिक पौष्टिक असावेत हे खरे, पण त्यासाठी त्या अन्नपदार्थांच्या स्रोताबद्दलची माहितीही असणे आवश्यक असते.