
पृथा वीर
आपण जितके आधुनिक जीवनशैलीशी जुळवून घेत आहोत तितकीच मॉड्युलर स्वयंपाकघरे लोकप्रिय होत आहेत. आपल्या देशात तर याला उत्तम मार्केट असून भारतातील सर्वोत्तम मॉड्युलर किचन ब्रँड्समध्ये स्पर्धा असते. त्यातही कस्टमाइज्ड आणि ऑर्गनाइज्ड किचनला वाढती मागणी असल्याने भारतातील अनेक ब्रँड्सनी नावीन्यपूर्ण डिझाईन, प्रीमियम मटेरियल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आणले आहे.
घरातील सर्वांचे पोट भरणारी जागा म्हणजे किचन अर्थात स्वयंपाकघर. घरातला हा कोपरा म्हणजे ‘तिची’ स्पेस. कालानुरूप तिच्या या स्पेसमध्ये बदल होत गेले. तिची स्पेस आता आधुनिक झाली आणि सुटसुटीत, नीटनेटकी, वावरण्यास सोयीची अशी मॉड्युलर किचन पद्धती आकाराला आली. मॉड्युलर किचनचे इंटिरियर तयार करताना ते पर्यावरणपूरक असावे यावरही भर दिला जातोय. त्याचप्रमाणे ‘मिनिमलिस्टिक’ डिझाईनमुळे कमी जागेतही सर्व सोयींनी युक्त किचन तयार होतेय.