
सिद्धार्थ खेमका
जागतिक अस्थिर वातावरण, अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे धक्कादायक निर्णय, परकी गुंतवणूकदारांचा विक्रीवरील भर अशा विविध कारणांमुळे भारतीय शेअर बाजार सध्या मंदीचा सूर आळवतो आहे. मात्र, मंदीतही संधी असते, त्यामुळे गुंतवणूकदारांनी याचा फायदा घेत उत्तम शेअर खरेदी केले, तर त्यांना दीर्घकालीन नफ्याचा लाभ होऊ शकतो. अशा काही आकर्षक शेअरची शिफारस येथे केली आहे.