
संजय कुमार
बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होत आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ची सत्ता हिसकावून घेण्यासाठी राष्ट्रीय जनता दल प्रयत्नशील आहे. मात्र, ‘इंडिया’ आघाडीमध्ये काँग्रेसची कामगिरी हा निर्णायक मुद्दा ठरत आला आहे. त्यामुळे, ‘इंडिया’ आघाडीमध्ये जागावाटप कसे होते, हाच मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. दुसऱ्या बाजूला ‘एनडीए’कडून नितीशकुमार हेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार का, हा खरा प्रश्न आहे.
या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. सत्ताधारी भाजप व संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि विरोधातील राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस यांची ‘इंडिया’ आघाडी यांच्यामध्ये प्रमुख लढत होत आहे. या निवडणुकीसाठी वातावरण तापण्यास सुरवात होत असून, दोन्ही बाजूंकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे.