
अजय बुवा, नवी दिल्ली
बिहारमधील निवडणूक आयोगाने मतदार यादीची विशेष सखोल पडताळणी (एसआयआर - स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हिजन) सुरू केल्यानंतर एकच वाद पेटला आहे. या प्रक्रियेला सोप्या भाषेत मतदार यादी शुद्धीकरण मोहीम म्हणता येईल.
खरे तर मतदार याद्यांमधील गोंधळ आणि त्यात अपेक्षित असलेला बदल या वादाची सुरुवातच मुळात महाराष्ट्रापासून, म्हणजेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून झाली होती. महाराष्ट्रातील निवडणूक कोणी कशी जिंकली, बनावट मतदार कसे घुसविण्यात आले यासारखे आरोप झाले.