
सुनील चावके
बिहारमधील मतदार पडताळणी प्रक्रिया वादात सापडली आहे. बिहारपाठोपाठ पुढच्या वर्षी निवडणुका होत असलेल्या विविध राज्यांत व नंतर देशातही ‘गहन पडताळणी’ची प्रक्रिया राबवली जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राजकारणातील इतर ज्वलंत मुद्दे मागे पडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्याशीच संघर्ष करण्याची वेळ विरोध पक्षांवर आली आहे.
भ विष्यातील लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, आधारकार्ड, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मनरेगा जॉब कार्ड वैध मानले जाणार नाहीत.