मुंबई: इलॉन मस्क. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उजवा हातच म्हणा ना.! ज्याच्या सोबत अमेरिकेने अनेक मोठ्या योजनांमध्ये सहभाग घेत मोठी आर्थिक गुंतवणूक गेली आहे. अशा व्यक्तीवर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि अत्यंत दानशूर व्यक्ती म्हणून जगाला परिचित असणारे बिल गेट्स यांनी गंभीर आरोप केला आहे. बिल गेट्स यांनी एका मुलाखतीत असे विधान केले आहे की, इलॉन मस्क जगातील सर्वात गरीब मुलांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरत आहेत त्यांच्या या विधानामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
बिल गेट्स यांनी इलॉन मस्कवर नेमके काय आरोप केलेत? त्याच्या मागे नेमकी काय कारणे त्यांनी सांगितली आहेत..? अमेरिकेतील निधी वाटपाच्या धोरणाबाबत त्यांनी काय म्हंटले आहे? मस्कच्या निर्णयामुळे भविष्यात जगभरातील आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होऊन अनेक बालमृत्यू होतील का..? यावर मस्क यांनी काय म्हंटले आहे हे सगळं जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या माध्यमातून..