

Yogi Adityanath Uttar Pradesh strategy
esakal
नवे वर्ष सुरू होताच उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून त्याबरोबरच दिल्लीतील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये पंकज चौधरी यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर वरिष्ठ भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या असल्याने एक स्पष्ट संदेश दिला गेला आहे : उत्तर प्रदेशात मोदी आणि योगी यांच्याच नेतृत्वाखाली २०२७ मध्ये मुदतीच्या आधी आणि अत्यंत चुरशीची निवडणूक लढविण्याची भाजपने तयारी सुरू केली आहे.