Permium|Maharashtra municipal elections 2026 : महापौर निवडीतून भविष्याची बीजे

Local body elections India : राज्यातील २९ महापालिकांमध्ये महापौर-उपमहापौर निवडणुका पार पडल्यानंतर भाजपला बहुमत मिळाले. मुंबईत ४४ वर्षांनंतर प्रथमच भाजपचा महापौर, एमआयएमने ‘किंगमेकर’ भूमिका बजावली, राज्यातील राजकीय नाट्य अधोरेखित झाले.
Maharashtra municipal elections 2026

Maharashtra municipal elections 2026

esakal

Updated on

दीपा कदम

राज्यातील सर्व महापालिकांमध्ये महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली असून, आता महापालिकांचा कारभार खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. बहुतांश महापालिकांमध्ये भाजपचा महापौर झाला असून, चंद्रपूरमध्ये काँग्रेसला धक्का देत भाजपने महापौरपद खेचून आणले आहे. महापौर-उपमहापौरांच्या निवडीमध्येही भविष्यातील राजकारणाची बीजे रोवली आहेत.

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या २९ महापालिकांच्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीने तब्बल २३ ठिकाणी सत्ता मिळवून ऐतिहासिक यश मिळवले. महायुतीने सर्वाधिक ठिकाणी सत्ता स्थापन केली असली, तरी सर्वाधिक महापौर पदे ही भाजपकडेच आली आहेत. राज्यातील २१ महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. मात्र अमरावतीसारख्या महापालिकेत ‘एमआयएम’च्या नगरसेविकेमुळे भाजपचा विजय सुकर झाला, तर चंद्रपूरमध्ये काँग्रेस आणि परभणीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बहुमत असूनही पक्षांतर्गत आणि महाविकास आघाडीतही एकमत होत नसल्याने महापौर निवडीचे मोठे नाट्य घडले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com