
सुनील चावके, नवी दिल्ली
बारा वर्षांतील सर्वात अवघड ठरलेली दिल्लीची निवडणूक जिंकताना, सत्तेतील सर्व साधनांनिशी चोहोबाजूंनी निरंतर हल्ले करून विरोधी पक्षाला अजिबात उसंत मिळू न देता कसा विजय मिळवायचा, याचा वस्तुपाठ भाजपने घालून दिला आहे. पंतप्रधानपदाचे उमेदवार झाल्यापासून नरेंद्र मोदी यांना दिल्ली विधानसभेने तीनवेळा हुलकावणी दिली.
पण जिद्द, चिकाटी आणि प्रयत्नांच्या पराकाष्ठेला साम-दाम-दंड-भेदाची जोड देत भाजपने तीन वेळा सत्तेत असलेल्या अरविंद केजरीवाल यांना असे काही सत्तेबाहेर काढून फेकले की त्यांना आता दिल्लीत पुनरागमन करणे जवळजवळ अशक्य ठरावे.