

Bonded Labour Act
esakal
कायद्याच्या अंमलबजावणीसाठी देशात गुन्हेगार मालकाला शिक्षा होण्यासाठी अकरा वर्षे लागली. अकरा वर्षांनंतर देशात पहिल्यांदा वेठबिगार कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली.श्रमजीवी संघटनेने वेठबिगारीबाबत इतिहास घडवला होता... या ऐतिहासिक घटनेनंतर लगीनगड्याची प्रथा कायमची हद्दपार झाली... इतिहासजमा झाली.
तंत्र्य ही संकल्पना अमूर्त आहे. त्याला मूर्तिमंत करण्याचं काम भारतीय संविधानाच्या भाग तीनमध्ये करण्यात आलं. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, संचाराचं स्वातंत्र्य, उपासनेचं स्वातंत्र्य, आपल्याला हवा तो उद्योग-व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य, संघटन करण्याचं स्वातंत्र्य... अशा अनेक स्वातंत्र्यांचा उल्लेख भाग तीनच्या अनुच्छेद १९ मध्ये केलेला आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला एक अधिकार प्रदान केला. जर तो अधिकार नसता, तर या स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त झाला नसता. तो अधिकार म्हणजे, शोषणाविरोधी अधिकार. अनुच्छेद २३ हा प्रत्येक नागरिकाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणारा, प्रत्येक नागरिकाला सन्मान देणारा शोषणाविरोधी अधिकारांबाबत आहे.