Premium|Global Anti Slavery Campaign : आदिवासी वेठबिगारांच्या संघर्षातून उभा राहिलेला जागतिक स्वातंत्र्याचा आवाज

Bonded Labour Freedom Movement : अमेरिकेतील व्यासपीठावर वेठबिगारमुक्तीच्या संघर्षाची गाथा मांडताना स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा आणि गुलामगिरीविरोधातील लढ्याचा जागतिक संदेश प्रभावीपणे पोहोचवणाऱ्या प्रेरणादायी अनुभवाचा हा लेख.
Global Anti Slavery Campaign

Global Anti Slavery Campaign

esakal

Updated on

‘‘तुमचे आणि आमचे स्वप्न एकच आहे, ते म्हणजे जगातील गुलामगिरी आणि वेठबिगारी नष्ट करणे. या उद्दिष्टाप्रती आपली निष्ठा हीच ईश्वराची सेवा आहे. देव मंदिर, मशीद, चर्च किंवा सिनेगॉगमध्ये नाही. त्याचा वास रंजलेल्या-गांजलेल्यांच्या मुक्तीमध्ये आहे. गुलामांच्या मुक्तीचं आपलं काम म्हणजेच प्रत्यक्ष परमेश्वराची आराधना आहे.’’

‘‘You and we together share a vision of the world where there will be no slavery or bondage. The work towards that vision is our service to God. God resides neither in temples, nor mosques, nor churches, nor synagogues but in freeing of the oppressed human being. To work for freeing slaves is our worship of the living God.’’

जगभरातून आलेले विशेषतः अमेरिकेतले श्रोते आणि त्यांच्यासमोर इंग्रजीतून बोलण्याचा फारसा सराव नसलेला मी बोलत होतो. युनिटॅरियन युनिव्हर्सलिस्ट असोसिएशनची सर्वसाधारण सभा भरली होती. त्यासाठी युनिटॅरियनचे जगभरातले प्रतिनिधी आणि विशेषतः अमेरिकेतले असे मिळून चारशे जण अमेरिकेतल्या बोस्टनमधील एका भव्य, उंची सभागृहात जमले होते आणि मी तिथे मुख्य वक्ता म्हणून निमंत्रित होतो... त्यांना इथल्या वेठबिगारमुक्तीच्या, संघर्षाच्या, वेदनेच्या कहाण्या सांगत होतो...

‘‘स्वातंत्र्य ही अत्यंत महागडी गोष्ट आहे; परंतु जगातील कोणतेही चलन ते विकत घेऊ शकत नाही. स्वातंत्र्याची किंमत फक्त वेठबिगारच मोजू शकतो. त्यालाच आपल्या अंतरंगातून धैर्य गोळा करून ‘नाही’ म्हणावं लागतं. त्याला मुक्त करण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही आणि गुलामगिरीपेक्षा केव्हाही उपासमार परवडेल. गुलामगिरीपेक्षा मृत्यू परवडेल.’’

अमेरिकेसारख्या सर्वार्थाने प्रगत आणि भावनेपेक्षा तर्कशुद्धतेला, बुद्धिनिष्ठतेला प्राधान्य देणाऱ्या श्रोत्यांसमोर मी बोलत होतो. मात्र, ठाणे जिल्ह्यातल्या वेठबिगारमुक्तीच्या संघर्षाच्या कहाण्या सारं सभागृह एकाग्रतेने ऐकत होतं. पिढ्यान्‌पिढ्या वेठबिगारीत खितपत पडलेल्या वेठबिगारांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रथम प्रज्वलित झाली तो क्षण आणि त्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा त्यांचा संघटनेचा प्रवास सारे शांतपणे लक्ष देऊन ऐकत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com