

BSE 100 Index and Stock Market
esakal
प्रमोद पुराणिक - pramodpuranik५@gmail.com
मुंबई शेअर बाजाराचा ‘बीएसई १००’ हा एक जुना आणि महत्त्वाचा निर्देशांक आहे. ‘बीएसई १००’ या निर्देशांकात मुंबई शेअर बाजारात नोंदणी असलेल्या मोठ्या कंपन्यांचा समावेश होतो. त्यामुळे या निर्देशांकाच्या माध्यमातून प्रामुख्याने लार्ज कॅप कंपन्यांच्या कामगिरीचा आढावा घेता येतो.
मुंबई शेअर बाजाराच्या ‘बीएसई १००’ या निर्देशांकाची सुरुवात तीन जानेवारी १९८९ रोजी झाली. सुरुवातीला त्याचे नाव ‘नॅशनल इंडेक्स’ असे होते. त्याच्या नावात १९९९ मध्ये बदल करण्यात आला आणि त्याचे नाव ‘बीएसई १००’ करण्यात आले.
या निर्देशांकाचे पहिले मूल्य तीन एप्रिल १९८४ रोजी ५८ नोंदवण्यात आले. ‘बीएसई १००’ या निर्देशांकात मुंबई शेअर बाजारात नोंदणी असलेल्या मोठ्या कंपन्यांचा समावेश होतो. त्यामुळे या निर्देशांकाच्या माध्यमातून प्रामुख्याने लार्ज कॅप कंपन्यांच्या कामगिरीचा आढावा घेता येतो. निर्देशांकातील कंपन्यांचा वेळोवेळी आढावा घेतला जातो.
जून आणि डिसेंबर या महिन्यांत दर सहा महिन्यांनी निर्देशांकातील कंपन्यांचा फेरविचार केला जातो. निर्देशांकात विविध क्षेत्रांतील कंपन्यांचा समावेश असल्यामुळे भारतीय शेअर बाजारातील मोठ्या कंपन्यांच्या कामगिरीचे एकत्रित चित्र त्यातून दिसते.