
Reading culture
esakal
वाचनप्रिय घर म्हणजे फक्त पुस्तकांनी भरलेलं कपाट नव्हे; तर एकमेकांना गोष्टी सांगणं, विचारांची देवाणघेवाण करणं... त्याने घरात वाचनासाठी पोषक वातावरण निर्माण होत असतं. मुलांना वाचनाची गोडी लागण्यासाठी घरात पोषक वातावरण करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे पालकांनी स्वत: पुस्तकं वाचावीत. पालकांना पुस्तक वाचताना बघितल्यावर मुलांचीही पुस्तकांशी मैत्री व्हायला लागते.
प्रिय पालक, तुमच्या घरातलं वातावरण वाचनासाठी पोषक आहे का? घरात ‘वाचनयोग्य वातावरण’ निर्माण करणं ही पालकांची जबाबदारी असते. तुमच्या पाल्यांच्या भावनिक आणि बौद्धिक विकासाची ही एक गुंतवणूक आहे असं समजा. ‘वाचनाला पोषक वातावरण’ म्हणजे नेमकं काय आणि ते कसं निर्माण करता येईल हे बघूया...
वाचनप्रिय घर म्हणजे फक्त पुस्तकांनी भरलेलं कपाट नव्हे; तर एकमेकांना गोष्टी सांगणं, विचारांची देवाणघेवाण करणं, तसंच कुतूहल जागरूक ठेवणं... त्याने घरात वाचनासाठी पोषक वातावरण निर्माण होत असतं. तुम्ही किती श्रीमंत आहात किंवा गरीब आहात याने काहीही फरक पडत नाही. ज्या घरात वाचन समृद्ध वातावरण असतं, त्या घरातल्या मुलांच्या मेंदूची संरचना अधिक मजबूत असते. त्यामुळे अशी मुलं अधिक समजूतदार होतात आणि त्यांची कल्पनाशक्तीही चांगली असते. वाचन हे समानतेचं साधन आहे; कारण ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांनाही प्रगतीची आणि कौशल्यं विकसित करण्याची संधी देतं. असं वातावरण तयार करण्यासाठी चार महत्त्वाचे घटक आहेत...