
योगिराज प्रभुणे
घर म्हणजे फक्त भिंतींचा चौकोन नसतो. त्या घरात असतो आठवणींचा हळवा कोपरा, अलगद जपलेल्या स्वप्नांचा दरवाजा आणि निरव शांततेची खिडकी. अशा घरासाठी फर्निचर निवडणं म्हणजे त्या निर्जीव भिंतींना आपली ओळख देणं. त्यामुळे त्यात असते सुशोभित सौंदर्याची भावना आणि नात्यांची गुंफण!
कधी एक निवांत असावा कोपरा,
शब्दांऐवजी शांततेशी संवाद साधणारा.
थकलेल्या दिवसांना विसावा देणारा,
तो खुर्चीवरचा क्षण हळूवारपणे जपून ठेवणारा!