
आपलं लाडकं AI आपल्यासाठी दिवस-रात्र झटतंय. रोज वेगळ्या प्रॉम्प्ट्सला वेगवेगळी उत्तरं देण्यातच त्याचा दिवस निघून जातो. अगदी जेवण बनवण्यापासून ते फिरायला जाण्याच्या ठिकाणांपर्यंत. मग आर्थिक नियोजनासारख्या महत्त्वाच्या कामासाठी एआयची मदत घ्यायची कल्पना मनात येणं साहजिक आहे.
अशीच कल्पना आमच्याही मनात आली!
आम्ही AI ला विचारलं आमच्या finances बद्दल. विचारताना, आम्ही एक साधारण पगाराची रक्कम सांगितली. ती होती ₹३०,०००. आम्ही त्याला असा एक प्रॉम्प्ट दिला- 'माझी salary ३०,००० रुपये आहे, माझ्यासाठी एक financial plan बनवशील का?' आणि मग त्याने आम्हाला एक सुटसुटीत आणि एकदम सखोल financial plan दिला. हा प्लॅन काय? खरंच तो अंमलात आणण्यासारखा आहे का? यावर अर्थतज्ज्ञ चार्टर्ड अकाउंटंट दिक्षा नाईक काय म्हणतात? तज्ज्ञांच्या मते हा प्लॅन तुम्ही-आम्ही वापरू शकतो का? हे सगळं वाचूयात आजच्या 'सकाळ प्लस'च्या या विशेष लेखात...