Women Leadership: महिला नेतृत्वाबाबत जगभर आशादायक वातावरण

महिला सक्षमीकरणाचे आशादायक पाऊल. जगभर महिला नेतृत्वाला मिळत आहे प्रोत्साहन.
Women Leadership
Women Leadershipesakal
Updated on

कल्याणी शंकर

सिस्टर ब्रॅम्बिला यांच्या नियुक्तीकडे एक प्रगतिशील पाऊल म्हणून जगभर पाहिले जात आहे. पुरूषांचे कार्यक्षेत्र असलेले हे पद आता पहिल्यांदाच महिलांसाठी खुले झाले आहे. कॅथलिक चर्चमधील सर्व धार्मिक आदेशांचे पर्यवेक्षण त्या करतील. कारण यापूर्वी कोणत्याही महिलेने हे प्रतिष्ठित पद भूषवले नव्हते, हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. अशा प्रकारे चर्चच्या कारभारातही महिलांचे योगदान अखेर मान्य केले गेले आहे आणि महिलांच्या अधिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचे व आवश्यक उदाहरण ठरले आहे.

गेल्या कांही दिवसांत महिला सक्षमीकरणाबाबत उत्साहवर्धक वाटाव्या अशा काही घटना घडल्या आहेत. त्यातील पहिली ऐतिहासिक घटना म्हणजे व्हॅटिकनच्या पोप फ्रान्सिस यांनी प्रथमच सिस्टर सिमोना ब्रॅम्बिला या महिलेची चर्चच्या प्रीफेक्ट (चर्चचे प्रशासकीय अधिकार क्षेत्र) या प्रतिष्ठित धार्मिक पदावर निवड झाली आहे.

५९ वर्षीय सिस्टर सिमोना ब्रॅम्बिला या कन्सोलेटा मिशनरीच्या दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर होत्या. आता त्यांची चर्चच्या इतिहासात या मोठ्या पदावर पहिल्यांदाच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीने जगभरच्या ख्रिस्ती धर्मात स्री पुरूष समानतेच्या बाबतीत थोडे पुढचे पाऊल पडले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com