Premium|Captagon Drug Trade : सीरियातील कॅप्टॅगॉनचा अब्जावधींचा काळा व्यापार; अमली पदार्थांतून उभे राहिले सत्तेचे आर्थिक जाळे

Captagon Drug Trade and Terrorism : सीरियातील यादवी युद्धाच्या काळात कॅप्टॅगॉन या उत्तेजक अमली पदार्थाचा व्यापार अब्जावधी डॉलर्सपर्यंत पोहोचला. असद कुटुंब, फोर्थ डिव्हिजन, तस्करीचे आंतरराष्ट्रीय जाळे आणि दहशतवादी संघटनांना मिळणारा आर्थिक आधार यांचा परस्परसंबंध.
Captagon Drug Trade and Terrorism

Captagon Drug Trade and Terrorism

esakal

Updated on: 

निखिल श्रावगे - nikhil.shravage@gmail.com

जागतिक भूराजकारणात दहशतवाद हा केवळ विचारसरणीचा किंवा धर्मांधतेचा प्रश्न नाही; तर त्यामागे मोठे अर्थकारणही दडलेले आहे. तेल, सोने, अमली पदार्थांची तस्करी आणि काळ्या पैशाच्या जोरावर दहशतवादी संघटना शस्त्रे खरेदी करतात, आपले जाळे विस्तारतात आणि तरुणांना हिंसेच्या मार्गावर ढकलतात. युद्धे, सत्तासंघर्ष आणि अमली पदार्थांचा व्यापार यांचे परस्परसंबंध त्यामुळे अधिक गुंतागुंतीचे बनतात. दहशतवादाची विचारसरणी माथी भडकवत असते ; तर त्यामागचे अर्थकारण हिंसेला जिवंत ठेवते.

दहशतवाद आणि दहशतवादी टोळ्यांचा अभ्यास करताना ‘कोणत्याही प्रकारे अराजकता माजवून आपले ध्येय साध्य करणे’ फक्त हेच त्यांचे लक्ष्य असते का, असा प्रश्न कायम पडायचा. आज जग रॉकेटच्या वेगाने चंद्र आणि इतर ग्रहांकडे कूच करीत असताना, अश्मयुगासारख्या परिस्थितीत राहून दहशतवादी कृत्ये पार पाडण्यासाठी नेमकी काय प्रेरणा आहे, हे सुरुवातीच्या काळात समजत नव्हते. विज्ञान आणि आधुनिकतेच्या शिखरावर पोहोचलेल्या जगात काही व्यक्ती किंवा गट अतिरेकी विचारसरणीचा मार्ग का स्वीकारतात, असे वाटत राहायचे. मात्र; या विषयाचे जसजसे आकलन वाढत गेले तसतसे दहशतवादाच्या मुळाशी केवळ राजकीय किंवा धार्मिक कारणे नसून, त्यामध्ये मोठे अर्थकारण दडलेले असते, हे लक्षात येऊ लागले. या प्रक्रियेत अमली पदार्थांचा आणि दहशतवादाचा जवळचा संबंध असल्याचे स्पष्ट झाले.

गेल्या काही दशकांमध्ये नवीन अमली पदार्थ आणि नवीन दहशतवादी टोळ्या सातत्याने जन्माला येत आहेत. वेगवेगळ्या स्वरूपात नजरेस पडणारे अमली पदार्थ आणि दहशतवादी टोळ्या यांना कुठेही अटकाव झालेला दिसत नाही. त्यांच्या या परस्पर संबंधाचा, त्यातल्या अर्थकारणाचा आणि राजकारणाचा आढावा घेणे त्यामुळेच गरजेचे आहे.

Loading content, please wait...