

Car Buying Guide
esakal
कार खरेदी करताना कारची किंमत, मायलेज किंवा वरवर चांगले दिसणारे फीचर्स एवढ्याच गोष्टी महत्त्वाच्या नसतात. तर योग्य कार निवडण्यासाठी मला कोणती कार आवडते? यापेक्षा माझ्या गरजेनुसार माझ्यासाठी योग्य कार कोणती असेल हे महत्त्वाचे आहे. शहरातील रोजच्या वापरासाठी हॅचबॅक प्रकारातील कार महत्त्वाच्या ठरतात. तर ज्यांचा रोज लांब प्रवास असतो त्यांच्यासाठी आरामासाठी सेडान कार उपयुक्त ठरतात, खराब रस्त्यांवर जास्त प्रवास करावा लागत असेल तर मग तुमच्यासाठी एसयूव्ही महत्त्वाची ठरू शकते आणि जर तुमचं कुटुंब मोठं असेल किंवा अनेक मित्रांबरोबर नेहमी प्रवास करत असाल तर तुम्हाला एमपीव्ही कार फायद्याची ठरेल.
जाहिरातीमध्ये १० लाखाला गाडी पाहिली म्हणजे ती तुम्हाला १० लाखालाच पडत नाही तर आरटीओ, विमा, फास्टॅग, अॅक्सेसरीज अशा अनेक गोष्टींने गाडीची किंमत कितीतरी वाढते. तुम्ही लोनवर गाडी घेत असाल तर कर्ज घेताना २०-४-१० रूल लक्षात ठेवा. २० टक्के डाउन पेमेंट करा, कर्जाचे ईएमआय चार वर्षांपर्यंतच ठेवा आणि पगाराच्या १० टक्के पेक्षा मोठा कर्जाचा हप्ता ठेऊ नका.
सेफ्टी फर्स्ट हे कायम लक्षात ठेवा. फीचर्सच्या भुलभुलैयाला बळी पडू नका, मोठी स्क्रीन किंवा सनरूफ अपघातात जीव वाचवत नाहीत. त्यामुळे एअरबॅग्ज कशा आहेत ते पाहा, कारबॉडीशेलची मजबूती पाहा, भारत एनकॅप क्रॅश टेस्ट रेटिंग आणि ईएससी या गोष्टींना प्राधान्य द्या.
कार घेताना डीलर तुम्हाला नवी कोरी गाडी देण्याच्या नावाखाली गोदामात महिने न् महिने धूळ खात पडलेली, रिपेअर केलेली किंवा टेस्ट ड्राईव्हची वापरलेली जुनी कार तर चिकटवत नाही ना? हे कसं ओळखाल त्यासाठी तुम्हाला पीडीआयची प्रोसेस माहिती असायला हवी? ही प्रोसेस नेमकी काय आहे? आणि कोणत्याही व्यक्तीने गाडी खरेदी करताना एकंदर कोणकोणत्या गोष्टींची माहिती घ्यावी. हे सगळं सविस्तर जाणून घेऊया सकाळ+च्या या लेखातून
Know Your Car Needs
esakal