saptrang@esakal.com
अश्मयुगात माणूस गुहेत राहात असला म्हणून काय झालं? त्यालाही व्यक्त व्हावं वाटलं असेलच की! मग त्यानं हातामध्ये दगड घेतला आणि गुहेतल्या ओबडधोबड दगडावर काही रेषा मारल्या. त्याच्या सोबत राहाणाऱ्या इतरांनीही असंच केलं असावं. तिथून पुढे आकार आले. मग चित्रं आली. पुढे कधीतरी या चित्रांना रंगांनी आपलंसं केलं. मग जसं मानवी जीवन अधिक आशयघन होत गेलं, तशी चित्रकलाही विकसित होत गेली. अश्मयुगीन माणसानं त्या ओबडधोबड दगडावरती मारलेल्या रेषेपासून सुरू झालेला हा एकरेषीय प्रवास आज टॅबवर स्टायलसच्या साहाय्यानं उमटवलेल्या डिजिटल रेषपर्यंत पोहोचला आहे.