पुणे: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी इयत्ता बारावीची यंदाच्या वर्षीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ पासून सुरु होत आहे. या परीक्षेसाठीची हॉलतिकीट बोर्डाकडून विद्यार्थ्यांना १० जानेवारीपासून उपलब्ध करून देण्यात आली होती.
दरवर्षीप्रमाणेच हे हॉलतिकीट बोर्डाकडून तयार करण्यात आले होते मात्र यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर जातीचा प्रवर्ग छापण्यात आला होता. विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट हे केवळ एखाद्या परीक्षेसाठी असते मग त्यावर जातीचा प्रवर्ग कशासाठी असा आवाज विद्यार्थी, शिक्षण आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी उठवल्यानंतर अखेर बोर्डाकडून हा निर्णय मागे घेण्यात आला.
पण मुळात बोर्डाकडून हा निर्णय का घेण्यात आला..? यावर शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षणतज्ज्ञांकडून काय आक्षेप घेण्यात आला..? त्यावर बोर्डाकडून काय स्पष्टीकरण दिले गेले..? बोर्डाने निर्णय मागे घेतल्यानंतर आता पुढे काय..? जाणून घेऊया.