
अखिलेश गणवीर
देशाच्या मध्यवर्ती असणाऱ्या नागपूर शहरामध्ये प्रवासासाठीही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, शहर वाहतूक, एसटी सेवा यांची सेवा प्रवाशांच्या गरजेच्या प्रमाणात नसल्यामुळे उपलब्ध सेवांवर ताण येताना दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळ, देशातील प्रमुख रेल्वे स्थानक, शहरात पसरत असलेले मेट्रोचे जाळे, महापालिकेची शहर वाहतूक सेवा, ऑटो, ई-रिक्षा, ओला उबेर टॅक्सी, लांब पल्ल्याच्या खासगी बस आणि एसटी महामंडळाची विदर्भातच नव्हे; तर अख्ख्या महाराष्ट्रातील गाव-खेड्यात जात असलेली ‘लालपरी’ ही नागपुरातील सार्वजनिकचा ‘कणा’ मानला जातो.