
डॉ. माधव शिंदे
रखडलेली शिक्षकभरती, घटत जाणारे अनुदान, पायाभूत सुविधांचा निर्माण होत असलेला प्रश्न, यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक त्या वयात योग्य ते ज्ञान आणि कौशल्य मिळत नाही. परिणामी ते श्रमबाजारात टिकाव धरण्यास असमर्थ ठरतात. असे असेल तर लोकसंख्या लाभांश कसा प्राप्त होणार?
सं युक्त राष्ट्र विकास कार्यक्रम या जागतिक पातळीवरील संस्थेद्वारे जागतिक लोकसंख्येच्या अनुषंगाने नुकताच अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार लोकसंख्येमध्ये जगामध्ये आघाडीवर असलेल्या भारताची लोकसंख्या २०२५ या वर्षात १४६.३९ कोटींच्या घरात पोहचली असून येणाऱ्या ४० वर्षात ती १७० कोटीपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.