Premium|Changing Village Memories : परके होत जाणारे आपलेच सण !

Changing Village Traditions : गाव बदलताना रस्ते, घरं आणि माणसांसोबत आठवणींचं गावही बदलतं. श्रद्धा, परंपरा आणि सामूहिक आनंदाच्या जागी स्पर्धा, बाजार आणि शक्तिप्रदर्शन येत असल्याची खंत मनात राहते.
Changing Village Memories

Changing Village Memories

esakal

Updated on: 

श्याम पेठकर - sakal.avtaran@gmail.com

गाव बदलतं तेव्हा फक्त रस्ते, घरं, झाडं आणि माणसं बदलत नाहीत... बदलत जातं ते आपल्या आठवणींचं गावही. कालपर्यंत आपलेपणाने साजरे केले गेलेले सण-उत्सवही आता आपल्यासमोर नव्या, काहीशा अनोळखी रूपात उभे राहतात. श्रद्धा, परंपरा आणि सामूहिक आनंदाच्या जागी स्पर्धा, बाजार

अन् शक्तिप्रदर्शन कधी येऊन बसलं ते कळलंच नाही. बदल अटळ आहे; पण प्रश्न एवढाच की बदलताना आपण नेमकं काय जपतोय आणि काय गमावतोय?

आपण खूप दिवसांनी म्हणण्यापेक्षा वर्षांनी आपल्या गावात जातो. आपल्या स्मरणात तेच गाव असतं जे आपण बालपावलांनी सोडलेलं असतं... आता मात्र बस थांब्‍यापासून सगळंच बदललेलं असतं. आपलंच गाव आपल्याला परकं वाटू लागतं. गावातही आपल्याला ओळखणारी माणसं नसतात. ओळखलं तर त्यात ती आपुलकी नसते, कारण सहवास नसतो... आपण बालपणीच्या गावातच राहणाऱ्या मित्राला म्हटलं की, ‘सारा गावच बदलला आहे रे!’ तर तो म्हणतो की, ‘‘काहीच त नाही बदललं... जे हाय तसंच त हाय...’’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com