
अभय सुपेकर
साधारण बारा-पंधरा दिवसांपूर्वी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिपदाचा शपथविधी होणार अशी बातमी पसरली तेव्हाच आश्चर्यमिश्रित चर्चा सुरू झाली. भुजबळ पुन्हा मंत्री झाले असून ओबीसी समाजातीलच ‘राष्ट्रवादी’चे धनंजय मुंडे यांना दिलेले अन्न आणि नागरी पुरवठा हे खातेही त्यांच्याकडे ओघाने आले आहे. एका अर्थाने ओबीसी नेत्याकडील पद राज्यातील दुसऱ्या ओबीसी हेवीवेट नेत्याकडे गेले आहे. मात्र एवढाच भुजबळांच्या मंत्रिपदाचा अर्थ नाही. त्यापलीकडेही बरेच काही अर्थ दडले आहेत.