

Supreme Court of India
esakal
अभिजित मोदे
भारतातील सर्वोच्च न्यायसंस्थेचे नेतृत्व करणारे पद म्हणजे मुख्य न्यायाधीश. सध्या या पदाभोवती सार्वजनिक चर्चा होत असली, तरी त्यापलीकडे जाऊन पाहिले तर हे पद भारतीय संविधान, न्यायव्यवस्था आणि लोकशाहीच्या संतुलनाचे एक अत्यंत महत्त्वाचे आधारस्थान आहे.
अलीकडे मुख्य न्यायाधीशांचे पद पुन्हा चर्चेत आले आहे, कारण काही न्यायालयीन टिप्पणी, धार्मिक संवेदनशीलतेशी संबंधित सार्वजनिक वाद आणि त्यावर उमटलेल्या तीव्र प्रतिक्रिया यांमुळे सरन्यायाधीशांच्या भूमिकेकडे देशाचे लक्ष गेले आहे. यामुळे केवळ एका व्यक्तीवर नव्हे, तर सर्वोच्च न्यायालयाच्या संवादशैलीवर, संस्थात्मक संयमावर आणि न्यायव्यवस्थेच्या सार्वजनिक प्रतिमेवर चर्चा सुरू झाली आहे.
मुख्य न्यायाधीश हे फक्त सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख नसतात, तर न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा, कार्यक्षमता आणि स्वायत्तता जपणारे सर्वोच्च घटनात्मक व्यक्तिमत्त्व असतात. त्यामुळे या पदाचा अभ्यास करताना व्यक्तीपेक्षा पदाचे घटनात्मक स्थान अधिक महत्त्वाचे ठरते.