
डॉ. अभय बंग
saptrang@esakal.com
महाराष्ट्रात १२,००० बालमृत्यू!’ ‘राज्यात बालमृत्यूंचे प्रमाण घटले’ या ३० मार्च २०२५च्या दु:खद वाटू शकणाऱ्या बातमीत एक मोठे यश लपलेले आहे. त्या यशाची कारणे, मर्यादा व पुढे काय याचा विचार या लेखात करू. या बातमीत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार वर्ष २०२४-२५मध्ये महाराष्ट्रात केवळ १२,४३८ बालमृत्यू झाले. दोन वर्षांपूर्वी ते १७,१५० होते. दोन वर्षांत ही खचितच मोठी घट आहे.