

Children affected by income inequality
esakal
आपण अनेकदा एखाद्या देशाची प्रगती त्याच्या अर्थव्यवस्थेवरून मोजतो. पण देश श्रीमंत झाला म्हणजे तेथील प्रत्येक व्यक्ती आणि विशेषत लहानमुले आनंदी, निरोगी आणि सुरक्षित आयुष्य जगतच असतील असे आपण गृहीत धरून चालतो. पण युनिसेफच्या ताज्या अहवालाने या समजुतीला तडा दिला आहे. बाहेरून गडगंज दिसणारे देश गरीब-श्रीमंतामधील दरीमुळे म्हणजेच विषमतेच्या वाळवीमुळे केवढ्या मोठ्या प्रमाणावर पोखरले गेले आहेत याची तुम्हाला कल्पना सुध्दा नसेल.
जगातील अनेक श्रीमंत देशांमध्ये गरीब मुलांना आजही पुरेसं अन्न मिळत नाही, अभ्यासाच्या बाबतीत वाचनातील, गणितातील मूलभूत कौशल्ये सुध्दा अनेकांमध्ये विकसित होत नाहीत, अनेक मुले मानसिकदृष्ट्या खचलेली आहेत, अनेक मुलांचा बराच वेळ पोटापाण्यासाठी काम करण्यासाठी जात आहे त्यामुळे ते स्पर्धेत मागे पडत आहे हे मी त्या देशांबद्दल बोलतोय जे देश आपल्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या खूप संपन्न आहेत.
तर दुसरीकडे काही देश असे आहेत की जे तुलनेने खूप श्रीमंत नाहीत पण आर्थिक समानतेच्या बळावर मुलांचे आरोग्य, शिक्षण आणि मानसिक स्थिरता या संदर्भात या देशांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. मग देशाच्या संपत्तीपेक्षा आर्थिक समानता अधिक महत्त्वाची का ठरते? श्रीमंत देशांमध्येही मुलांचे जीवनमान का खालावत आहे? कोणते देश मुलांच्या विकासात आघाडीवर आहेत आणि कोणते मागे पडले आहेत? या प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी सकाळ+चा हा लेख नक्की वाचा.