child photo on social media
Esakal
पुणे – ऐक ना.. तुझा हा फोटो खूपच ‘क्यूट’ आला आहे.. मी हा माझ्या सोशल मिडियावर टाकला तर चालेल का गं तुला..? ३२ वर्षांची आई ही आपल्या पाच वर्षाच्या मुलीला हा प्रश्न विचारतीये.....
कोणाला पचनीच पडत नसेल ना..? मुलांना काय कळतं, त्यांची कशाला परवानगी घ्यायची असंच तुम्हालाही वाटतं ना? पण डिजिटल मिडिया या विषयातल्या अभ्यासक, डिजिटल वेलबीइंग कोच, आणि Cyber Maitra व Gry Foundation या संस्थांच्या संस्थापिका मुक्ता चैतन्य मात्र सांगतात, अशी परवानगी घेतली पाहिजे. तसेच कोणाला तुमचे फोटो इंटरनेटवर टाकायचे असतील तर त्यांनीही तुमची रितसर परवानगी घेऊन मगच फोटो अपलोड केले पाहिजेत. कारण तुमचा प्रत्येक फोटो तुमचं किंवा तुमच्या मुलांचं ‘डिजिटल प्रोफाइल’ तयार करत असतं. फोटोतून तुमची आणि तुमच्या मुलांची माहिती अनेक नको असलेल्या लोकांपर्यंत पोहचत असते. त्यामुळे या माध्यमाचे धोके जाणून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे.
इंटरनेटवर एखादी माहिती टाकली. नंतर तुम्ही ती डिलिटही केली तरही ती कधीच इंटरनेटवरून काढता येत नाही. जी गोष्टी एकदा का इंटरनेटवर गेली ती माहिती कधीच मिटवणं शक्य नसल्याचं मुक्ता चैतन्य सांगतात. त्यामुळेच कितीही प्रेमापोटी, कौतुकापोटी आपण मुलांचे फोटो टाकत असू तरी ते फोटो तुमच्या मुलाची माहिती साठवत असतात, जे त्यांच्या पुढील आयुष्यातही त्यांना त्रासदायक ठरू शकतात.
हा एकूणातच विषय काय आहे. मुलांचे फोटो टाकताना काय काळजी घ्यावी, डार्क वेब काय प्रकार आहे, सोशल मिडिया संबंधी अशा काही गंभीर घटना समोर आल्या आहेत का.. तज्ज्ञ याविषयी काय म्हणतात हे सगळंच जाणून घेऊया सकाळ+ च्या या विशेष लेखाच्या माध्यमातून...