
जयदेव रानडे
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची बाजू घेण्यास आणि या हल्ल्याच्या निषेधार्थ संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील मांडलेल्या ठरावाला खो घालण्यात चीनने कमालीची तत्परता दाखवली. वरकरणी चीन भारताशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याचा देखावा करत असतो. पण त्यामागचा कावा ओळखून भारताने सावध भूमिका घेणे आवश्यक आहे.
पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या निष्पाप नागरिकांच्या हत्येनंतर चीन आणि पाकिस्तान यांच्यातील घनिष्ठ संबंधांवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची बाजू घेण्यास आणि या हल्ल्याच्या निषेधार्थ संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील मांडलेल्या ठरावाला खो घालण्यात चीनने कमालीची तत्परता दाखवली.