

Rented Children in China
esakal
मुले जवळ नाहीत, वृद्ध आई-वडिलांना एकटेपणाने ग्रासले आहे. मनात साचलेल्या भावना ऐकून घेणारे, प्रेमाने दोन शब्द बोलणारे आणि सुख-दुःखात बरोबर असणारे कोणीच नाही. कधी घरात दिवसभर माणसाचा आवाज ऐकू येत नसल्याने मन अस्वस्थ होते. कोणासोबत फिरायला जावे, ट्रेकिंग करावे, दवाखान्यात तपासणीसाठी जावे किंवा कधी चहा पित गप्पा कराव्या, अशी इच्छा असतानाही अनेक वृद्धांना एकट्यानेच दिवस काढावे लागतात.
वृद्धांच्या आयुष्यात निर्माण झालेली ही पोकळी भरून काढण्यासाठी चीनमध्ये एक नवा व्यवसाय उदयाला आला आहे. या व्यवसायात तरुण-तरुणींना पैसे देऊन वृद्धांसोबत वेळ घालवण्यासाठी, त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी, त्यांना फिरायला नेण्यासाठी आणि दैनंदिन कामांत मदत करण्यासाठी बोलावले जाते. एवढेच नाही, तर रुग्णालयात तपासणीसाठी सोबत जाणे, औषधे आणणे, स्मार्टफोन वापरायला शिकवणे आणि गरज पडल्यास घरातील छोट्या-मोठ्या कामांत मदत करणे, अशा सेवाही दिल्या जातात. या तरुणांना Rented Children (भाड्याने मिळणारी मुले) असे म्हटले जाते.
माणसांच्या सहवासाचीही किंमत ठरवता येते का? पैशांच्या मोबदल्यात मिळणारी सोबत खऱ्या नात्यांची उणीव भरून काढू शकते का? या व्यवसायामुळे वृद्धांची काळजी घेण्याची जबाबदारी हलकी होते की कौटुंबिक नात्यांचे स्वरूप बदलते? या प्रश्नांचा मागोवा घेत एकटेपणावर उपाय शोधणाऱ्या चीनमधील या नव्या उद्योगाची कहाणी सकाळ+च्या लेखाततून जाणून घेऊया.