Premium|China Solar Energy: जगात सौरऊर्जेत नंबरवन असणाऱ्या चीनची जगभरात चर्चा का? चीन सौरऊर्जेत नेमके कोणते प्रयोग करतंय आणि नुकतंच समोर आलेलं संशोधन काय?

Solar-powered Thermal Desalination : खाऱ्या पाण्याचं गोड्या पाण्यात रूपांतर करणारं चीनचं महत्त्वाचं संशोधन नेमकं काय?
China Solar Energy

China Solar Energy

Esakal

Updated on

पुणे – अगदी डास मारण्याच्या बॅटपासून सणासुदीला लावल्या जाणाऱ्या लाइटच्या माळांपर्यंत आपण आपल्या रोजच्या आयुष्यात ‘चायना मेड’ वस्तू मोठ्या प्रमाणात वापरतो. एकीकडे आपण ‘चायना मेड’ वापरू नका असा प्रसार जरी करत असलो तरी दुसरीकडे अनेक ठिकाणी आपल्याला त्याला पर्यायी चांगल्या भारतीय किंवा अन्य कोणत्याही ब्रॅन्डच्या वस्तूच उपलब्धच होत नसल्याने अपरिहार्यतेने का होईना पण भारतीय माणूस बऱ्याच प्रमाणात चायनीज वस्तू वापरतो आहे.

‘चायना मेड’ वस्तूंसोबतच आता चीनच्या सौरऊर्जेचीदेखील जगभरात चर्चा आहे. चीन सध्या सौरऊर्जेच्या क्षेत्रात अनेक प्रयोग करतंय म्हणूनच आज चीन हा जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश झाला आहे. एवढंच नाही तर जागतिक स्तरावर वापरल्या जाणाऱ्या सौर पॅनेल्स, पॉलिसिलिकॉन, वेफर्स आणि सोलर सेल्सच्या उत्पादनात चीनचा सुमारे ८० टक्क्यांहून अधिक वाटा आहे. चीनने वाळवंटात सोलर पॅनेल बसवत नवे प्रयोग केले, समुद्रात पॅनेल बसवले, चीनमधील शाळा, कारखाने, सरकारी कार्यालये, घरं सगळ्यावर सोलर पॅनेल आहेत. सौरऊर्जेवर चालणारी नवनवी उपकरणं चीन बनवतंय. गेल्या वीस दशकात चीनने सौर ऊर्जा क्षेत्रात केलेली ही प्रगती थक्क करणारी आहे. सगळंच चीन नेमकं काय करतोय आणि कसं करतोय हेच आज आपण या सकाळ+ च्या विशेष लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com