
अक्षय शेलार
shelar.abs@gmail.com
पोलिसांचा विचार करायचा म्हटलं की बहुतांश आपण पुरुषांच्या दृष्टिकोनातून विचार करू लागतो. त्याकरिता हिंदी चित्रपट जबाबदार ठरतात. ‘दिल्ली क्राइम’ या मालिकेसारख्या कलाकृतींचा अपवाद वगळता मध्यवर्ती भूमिकांमध्ये स्त्रिया असणारे पोलिसपट पाहायलाच मिळत नाहीत.
मग नव्याने पोलिस खात्यात रुजू झालेले अधिकारी असतील (उदा. ‘शागिर्द’) किंवा अनुभवी अधिकारी असलेले (उदा. ‘गंगाजल’) पोलिसपट असतील, सगळीकडे पुरुषांचीच मक्तेदारी दिसते. संध्या सूरी दिग्दर्शित ‘संतोष’मध्ये मात्र अगदी शीर्षकापासूनच ही मक्तेदारी खोडून काढली जाते.