
Child medicine dosage
esakal
‘कोल्ड्रिफ कफ सिरप’ दुर्घटना म्हणजे भारताच्या आरोग्य व्यवस्थेला एक धोक्याचा संकेत आहे. औषधनिर्मितीतल्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता नियंत्रण, नियामक यंत्रणांची दक्षता आणि पालकांची जागरूकता आवश्यक आहे. ‘कमीत कमी औषधे आणि जास्त संयम’ हेच लहान मुलांच्या आरोग्याकरिता समर्पक ब्रीदवाक्य ठरते.
ध्य प्रदेशातील १४ लहान मुलांच्या मृत्यूमुळे चर्चेत आलेल्या ‘कोल्ड्रिफ कफ सिरप’ प्रकरणामुळे औषधनिर्मितीतील गुणवत्ता नियंत्रण, नियामक यंत्रणांची कार्यक्षमता आणि पालकांच्या जागरूकतेबाबत गंभीर प्रश्न ऐरणीवर आले आहेत. या दुर्घटनेमधून सर्दी-खोकल्यासाठी सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळे केवढा मोठा धोका निर्माण होऊ शकतो, हेदेखील अधोरेखित झाले आहे. कोल्ड्रिफ सिरपमुळे घडलेली दुर्घटना, त्यामागील वैज्ञानिक कारणे, औषधनिर्मितीतील त्रुटी आणि लहान मुलांना औषधे देताना पालकांनी घ्यावयाची काळजी याबाबतची सजगता सर्व थरातल्या नागरिकांमध्ये निर्माण होणे, आता गरजेचे झाले आहे.