

कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या एका सर्वसामान्य माणसाला काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपद दिले. यातूनच काँग्रेस हा जनसामान्यांचा पक्ष आहे आणि सामान्य माणसाचे दुःख दूर करण्याचा काँग्रेसचा सुरुवातीपासून प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे, हेच अधोरेखित होते. संविधानाचे जतन आणि संवर्धन या माध्यमातून तेच कार्य आपण पुढे सुरू ठेवणार आहोत, असे वक्तव्य माजी आमदार व काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.‘सरकारनामा’चे प्रतिनिधी अरूण जैन यांनी त्यांच्याशी बातचीत केली.