

Priyanka Gandhi Vadra Leadership
esakal
राहुल गांधी सदैव घाईत आणि रागात असतात, तर प्रियांका या मात्र शांत आणि हसतमुख. जे राहुल गांधींना जमले नाही ते प्रियांका गांधी-वद्रा करून दाखवतील आणि दोघांच्याही गुणवैशिष्ट्यांमुळे काँग्रेस पक्षात लढण्याचा जोम निर्माण होईल, अशी आशा काँग्रेसजनांना वाटते.
लो कसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध वैचारिक युद्ध लढावे आणि त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी-वद्रा यांनी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करावे, असा एक प्रस्ताव कॉँग्रेसच्या वर्तुळात सध्या चर्चिला जातोे आहे. हा विचार गांधी कुटुंबापर्यंत पोहोचवला गेला आहे.