
अजय बुवा
तब्बल अकरा वर्षे सत्तेबाहेर राहिल्याने गमावलेली राजकीय ताकद काँग्रेसने परत कमावण्याचा चंग बांधला आहे. संघटनेची बांधणी अन् ऐतिहासिक-वैचारिक वारसा सांगून जनमानसाला नव्याने आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने अहमदाबादला झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनातून भविष्यातील वाटचाल ठरविण्याचा प्रयत्न केला. गतवैभव मिळवण्याचा हा मार्ग बराच खडतर असल्याचे दिसते...
काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक आणि राष्ट्रीय अधिवेशन अहमदाबाद येथे ८ व ९ एप्रिल २०२४ रोजी झाले. ‘संकल्प, समर्पण, संघर्ष’ अशा भावी वाटचालीचे संकेत देणारा न्यायपथ’ हा ठराव संमत करून पुन्हा शक्तिशाली होण्याचा निर्धार काँग्रेसने व्यक्त केला. मात्र, पारंपरिक कार्यपद्धती, निर्णयप्रक्रियेत लवचिकतेचा अभाव अन् त्याच त्याच मुद्द्यांवरचे चर्वितचर्वण पाहता, ही वाटचाल खडतर दिसते