
सस्तन प्राण्यांमध्ये सर्वात यशस्वी सर्वोच्च भक्षक होण्याचा मान निश्चितच मार्जार कुळातील सर्वच प्रजातींना जाईल. जगभरात आढळणाऱ्या ३९ पैकी भारतात मांजरांच्या १६ प्रजाती सापडतात. लहान मांजरांच्या संवर्धनाकडेही गंभीरपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. भारतातील मोठ्या आणि लहान मांजरांना वाचविण्यासाठी संवर्धन दृष्टी अधिक व्यापक करणे क्रमप्राप्त ठरेल.