
रवि आमले
सगळ्या कटकाल्पनिका सुरू होतात एकाच बिंदूवर, की हिटलरने जीवन संपवले नाही. येथून पुढे मात्र त्यांना विविध फाटे फुटतात. त्यातला एक फाटा दक्षिण अमेरिकेत जातो, दुसरा अंटार्क्टिकात, तर तिसरा जातो थेट अंतराळात. अन्य उपफाट्यांची तर गणतीच नाही.
इतिहासकार हॅरिसन ॲशक्रॉफ्ट बर्लिनच्या रस्त्यावरून चालले होते. अचानक एका ट्रकने त्यांना उडवले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. वरवर पाहता एक दुर्घटना वाटत होती ती. पण तो अपघात नव्हता. ती जाणीवपूर्वक केलेले कृत्य होते.